आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:3 केंद्रांवर हरभरा खरेदी सुरू, क्विंटलला 5335 चा हमीभाव‎

धाराशिव‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हमीभावाने हरभरा खरेदी करण्यास‎ शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे.‎ मंगळवारपासून (दि.१४ मार्च)‎ जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर,‎ लोहारा येथील केंद्र सुरू झाले आहेत.‎ उर्वरित सहा केंद्रावर आगामी दोन‎ दिवसात हरभऱ्याची खरेदी सुरू करण्यात‎ येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी‎ आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन‎ नोंदणी करणे आवश्यक आहे. हमीभाव‎ केंद्रांवर शेतकऱ्यांना हरभऱ्याला प्रति‎ क्विंटल ५३३५ रुपये भाव मिळणार आहे.‎ आडत बाजारात हरभऱ्याला प्रति‎ क्विंटल सरासरी चार हजार रुपये भाव‎ मिळत होता.

शासनाने एक मार्चपासून‎ हमीभाव खरेदी केंद्रांना शेतकऱ्यांकडून‎ ऑनलाइन नोंदी घेण्यास सुरूवात केली ‎.‎ त्याप्रमाणे जिल्ह्यातील नऊ हमीभाव‎ खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात‎ शेतकऱ्यांनी हरभऱ्याची नोंद केली.‎ जिल्ह्यातील तीन हमीभाव खरेदी केंद्र‎ सुरू झाले आहेत. उर्वरित सहा हमीभाव‎ खरेदी केंद्रही दोन दिवसांत सुरू करण्यात‎ येणार आहेत. केंद्रातील सुविधा व‎ आलेला माल ठेवण्याची व्यवस्था पाहून‎ खरेदी करण्यात येणार आहे. ऑनलाइन‎ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा हरभरा‎ खरेदी करण्यात येत आहे.

आडत‎ बाजारातील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा‎ हरभरा कमी भावाने खरेदी केला खत,‎ बियाण्याचे पैसे देण्यासाठी दोन महिन्यात‎ शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने‎ हरभऱ्याची विक्री केली. सध्या हमीभाव‎ मिळत असल्याने आनंद व्यक्त होत‎ आहे. शासनाने दोन महिन्यांपूर्वीच‎ हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची‎ गरजही त्यांनी व्यक्त केली.‎

हमीभावासाठी ऑनलाइन नोंदणी
शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला शासकीय हमीभाव‎ खरेदी केंद्रात सरासरी ५३३५ रुपये प्रति‎ क्विंटलप्रमाणे भाव मिळणार आहे. यासाठी‎ ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी‎ करण्यासाठी ई-पीक पाहणी केलेला ७/१२,‎ आठ-अ, बँक पासबुक व आधार कार्डसह‎ शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर भेट देऊन नोंदणी‎ करावी. १४ मार्च रोजी तीन केंद्र सुरू केले‎ असून दोन दिवसांत उर्वरित केंद्र सुरू होणार‎ आहेत.‎ -मनोज बाजपे, जिल्हा पणन अधिकारी.‎

बातम्या आणखी आहेत...