आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात धुमाकूळ:रुई येथे ग्रामपंचायतीत  लंपी आजाराबाबत ग्रामसभा

लोणी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परंडा तालुक्यातील रुई येथे ग्रामपंचायत व पशुसंवर्धन यांच्या संयुक्त विद्यमानाने लंपी आजारा बाबत ग्रामसभा आयोजित करण्यात आली तालुक्यातील रुई येथील पशुपालकना लंपी स्किन या आजारा विषयी जनजागृती करून लसीकरण करण्यात आले. लंपी आजार होऊ नये तसेच झाल्यास घ्यावयाची काळजी याविषयी पशुधन विकास अधिकारी संजय पुराणिक यांनी मार्गदर्शन केले तसेच ग्रामसेवक यांनी विविध सरकारी योजना संदर्भात माहिती दिली.

यावेळी सरपंच कुसुम जगताप उपसरपंच मीरा पाटील, ग्रामविकास अधिकारी नामदेव नंदनवार, पशु पालक अजिनाथ गाडे राजेंद्र पाटील ,दिलीप मुळीक,नानासाहेब मुळीक ,राम मुळीक, भीमराव मुळीक ,नारायण मुळीक आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.लंपी आजाराने गेल्या काही दिवसांत देशात धुमाकूळ घातला आहे.

राज्यात पशुधन जाण्याचे प्रमाण तसे कमी असले तरी देशातील अनेक राज्यात हजारो जनावरे या आजाराला बळी पडली आहेत. सोलापूर जिल्हयात नुकतचे एक जनावर लंपीमुळे दगावल्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सतत डयूटीवर राहण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लसीकरणाला पशुपालकांचा चांगला प्रतिसाद असल्याचे दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...