आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:ग्रा.पं. निवडणूक तयारी अंतिम टप्प्यामध्ये

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील १६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवारी (दि.१८) मतदान होणार असून प्रशासनाच्यावतीने आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेसाठी लागणारे आवश्यक मनुष्यबळांना अगोदरच प्रशिक्षण देण्यात आले आहेत.

तसेच तालुका स्तरावरुन मतदान यंत्र मागणीनुसार तहसीलदार यांना पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या स्तरावरुन त्याचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच मतदानाच्या पूर्व संध्येला एक दिवस अगोदर सर्व केंद्रावर मतदान यंत्र, कर्मचारी व पोलिस पोहचणार आहे. यासाठी महसूल, ग्रामविकास आणि पोलिस प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असल्याचे समाेर आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...