आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मदहनाचा प्रयत्न:ग्रामसेवक मनमानी कारभार; त्रासाला कंटाळून ग्रामस्थाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

उस्मानाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेळोवेळी तक्रार देऊनही ग्रामसेवक कारवाई केली नाही. कारवाईसाठी गट विकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाला आदेश ग्रामसेवक मनमानी कारभार करत आहे. यास कंटाळून एका नागरिकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिसांनी आत्मदहन करणाऱ्यास ताब्यात घेतल्यामुळे अनर्थ टाळला.

तुळजापूर तालुक्यातील आरोळी बुद्रुक येथे घर क्रमांक ३८० जागेची फेरफार नोंद व जागे समोरील अतिक्रमण काढण्यासाठी अर्जदार शिवाजी कोळी यांनी २०१७ ते २०२२ पर्यंत संबंधित ग्रामसेवक, गटविकास अधिकारी तसेच जिल्हा अधिकारी यांना वेळोवेळी लेखी स्वरूपाचे तक्रार अर्ज दिले होते. त्यानंतरही कारवाई करण्यात आली नसल्याने कोळी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास सात जून रोजी निवेदन देत आत्मदहनाचा इशारा दिला होता.

त्यानुसार सरपंच व ग्रामसेवक यांच्या जाचास कंटाळून आत्मदहन करणार असल्याचे त्यात स्पष्ट केले होते. त्यानुसार कोळी यांनी बुधवारी दुपारी १:३०. वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिस प्रशासन यांनी शिवाजी कोळी यांना आत्मदहन करत असताना ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सरपंच आणि ग्रामसेवकाच्या जाचामुळे हे पाऊल उचलले असल्याचे सांगत संबंधितावर कारवाई करण्याची मागणीही कोळी यांनी केली. आत्मदहन असल्यामुळे पोलिसांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोळी यांना आनंद नगर पोलिस स्टेशनच्या पथकांनी ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...