आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय सैनिक सन्मान सोहळा:येडशीत आजी-माजी सैनिकांचा सत्कार

येडशी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत पवार यांच्या वतीने दिशा फांउडेशनच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय सैनिक सन्मान सोहळा हा कार्यक्रम (दि.१५) सोमवारी सिद्धेश्वर मंदिर येडशी येथे आयोजित करण्यात आला होता. देशसेवा हेच आपले कर्तव्य मानून देशसेवेसाठी योगदान दिल्याबद्दल येडशी येथील सर्व आजी व माजी ८५ सैनिकांचा शाल, पुष्प गुच्छ, रोपवाटिका देवून सत्कार करण्यात आला.

तसेच सैनिकांच्या पत्नींची सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेची पूजा आजी माजी सैनिकांसह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन संतोष डुमने, सूत्रसंचालन सचिन शिंदे यांनी केले. या वेळी तालुका सरचिटणीस गजानन नलावडे, चंदन नलावडे, अमोल ठाकर, किरण नकाते, मकरंद पाटील, अनिल कोरे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...