आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील सर्व शाळेत //"आजी आजोबा दिन//" साजरा करण्याचा निर्णय शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला असून याबाबतचे परिपत्रक सर्व जिल्हा व तालुका स्तरावर असणाऱ्या गटशिक्षण कार्यालयास देण्यात आले असुन या निर्णयाचे स्वागत होत आहे. सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी अथवा व्यवसाया निमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी आजोबांवर असते. शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते आजी आजोबांसोबत घालवतात.आजी आजोबा आणि नात किंवा नातू हे नाते विलक्षण वेगळे असते म्हणून आजी आजोबा पहिले मित्रच असतात.नात्यांची खरी जडण-घडण होत असते म्हणून आजी आजोबांचे नातवांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणे आजच्या काळाची गरजअसून हे नातं पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे व प्रेरणादायी ठरणार आहे.शाळेतील अनुभवासह आजी आजोबांचे अनुभव त्यांच्या हितगुजातून मिळणारी माहिती या गोष्टी पाल्यांच्या जडण घडणीसाठी पोषक ठरतात.
त्यामुळे शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून आजी आजोबांना शाळेत आमंत्रित करून मुलांशी संवाद, खेळ व गप्पा गोष्टी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ओळख करण्यासाठी //"आजी आजोबा//" दिवस शाळेत साजरा करणे संस्कार पूर्णतेच्या दृष्टीने गरजेचे आहे. मुलांना शाळेबरोबरच आजी आजोबांच्या महत्त्वपूर्ण नात्याची नव्याने ओळख होऊन त्याची दृढता होण्यासाठी //"आजी आजोबा//" दिवस साजरा होणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या रविवारी //"आजी आजोबा//" दिवस साजरा केला जातो.यावर्षी १० सप्टेंबर, २०२३ रोजी //"आजी आजोबा//" दिवस असून त्याअनुषंगाने त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी हा उपक्रम राबवून राज्यस्तर, जिल्हास्तर व शाळास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची बाबत शासनाच्या विचाराधीन असल्यामुळे सर्व शाळात आजी आजोबा दिन साजरा करण्याचे निर्देश सर्व शाळाना देण्यात आले आहेत.
सदरील दिवशी आजी आजोबांकरिता खालील प्रमाणे उपक्रम राबविण्यात यावेत- सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचा परिचय करून द्यावा.आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, चित्रकला नृत्य असे कार्यक्रम आयोजित करावेत.विटी- दांडू, संगीत खुर्चीसारख्या खेळात सहभागी होऊन बालपणीच्या आठवणी ताज्या होणार आहेत,आजी आजोबां सोबत शाळेतील शिक्षकांनी सुद्धा सहभाग घ्यावा. पारंपरिक वेशभूषेमध्ये आजी आजोबा यांना बोलवावे. महिलांसाठी मेहंदी आणि वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात करणे अपेक्षित आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.