आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास:आजी-आजोबांची हत्या करणाऱ्या संशयित नातवाला 3 तासांत अटक

अभोणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळवण तालुक्यात वेरुळे गावात आजी- आजोबा खर्च करण्यास पैसे देत नाहीत, भेदभाव करतात याच्या रागातून नातवाने आजी व आजाेबाच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली होती. अभोणा पोलिसांनी या घटनेचा जलद गतीने तपास करून अवघ्या तीन तासांत संशयित नातवास जेरबंद केले. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी या तपास पथकाचे १५ हजारांचे बक्षीस देऊन कौतुक केले आहे.

वेरूळे गावाजवळून शेतातील घरात राहणारे नारायण मोहन कोल्हे (९४), सकुबाई नारायण कोल्हे (८८) हे दांपत्य रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची खबर शनिवारी (दि.३) त्यांचा मुलगा अमरचंद नारायण कोल्हे ( ६६, रा. वेरुळे, हल्ली रा. अभोणा) यांनी अभोणा पोलिसांना दिली होती. पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून अभोणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले होते. अभोण्याचे सहायक निरीक्षक नितीन शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक भोईर व सहकाऱ्यांनी या आव्हानात्मक तपासाला योग्य दिशा दिली होती. तसेच फॉरेन्सिक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, डॉग स्कॉड व तांत्रिक विश्लेषक यांचे सहकार्य लाभल्याने संशयित काळू उर्फ राजकुमार हरी कोल्हे ( रा. वरखेडा शिवार ता. कळवण ) यास ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...