आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाची जय्यत तयारी:ग्रापं. निवडणूक; अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

तुळजापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण गावागावात भर हिवाळ्यात तापले असताना दुसरीकडे प्रशासनाने आपली तयारी सुरु केली आहे. त्यानुसार मंगळवारी पहिले निवडणूक प्रशिक्षण तहसील कार्यालयात पार पडले. दुपारी तीन तास चाललेल्या या प्रशिक्षणाला ३० निवडणूक निर्णय अधिकारी व ३० सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

७५० कर्मचारी तैनात
४८ ग्रामपंचायतींच्या १६६ प्रभागासाठी मतदान होत आहे. यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान अधिकारी व तीन कर्मचारी तैनात असणार आहेत. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी जवळपास ७५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये दहा टक्के कर्मचारी राखीव असणार आहेत.

उमेदवारी अर्ज, २५ टेबल
निवडणुकीचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी २५ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी २५ निवडणूक निर्णय अधिकारी तसेच २५ सहाय्यक नियुक्त करण्यात आले आहेत. दोन ग्रामपंचायतीसाठी एक निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...