आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणूक निकाल:तुळजापूर ग्रामपंचायतींच्या 48 जागांबाबत मोठी उत्सुकता

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यावर वर्चस्व कोणाचे? याचा फैसला उद्या मंगळवार (दि. २०) सकाळी होणार आहे. ४८ ग्रामपंचायतीचा निकाला नंतर विद्यमान आ. राणा जगजीतसीह पाटील व माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या वर्चस्वाचा फैैैैैसला होणार आहे.तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीची व्यवस्था नळदुर्ग रोड वरील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा स्पोर्टस् हाॅल मध्ये करण्यात आली आहे. मंगळवार (दि.२०) सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण १८ टेबल ची व्यवस्था करण्यात आली असून मतमोजणी च्या १० फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक टेबल वर १ मतमोजणी पर्यवेक्षक, १ सहाय्यक व १ मास्टर ट्रेनर ची व्यवस्था करण्यात आली आहे.

४८ ग्रामपंचायतींची मतमोजणी केवळ २ तासांत उरकण्याचे नियोजन निवडणूक विभागाने केल्याची माहिती प्राधिकृत अधिकारी तहसीलदार सौदागर तांदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नायब तहसीलदार अमित भारती, दत्ता नन्नवरे आदींची उपस्थिती होती.

तालुक्याचा कल स्पष्ट होणार
आ. पाटील यांनी पक्ष बदलत भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर होत असलेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत तालुक्यात पक्षाचे वर्चस्व असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान आ. पाटील यांचा समोर असणार आहे. तर माजी आ. मधुकरराव चव्हाण यांचा साठी तालुक्यातील अस्तित्वाची लढाई असणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकी नंतर पहिलीच सार्वत्रिक निवडणुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...