आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोहारा तालुक्यातील अचलेर येथील श्रेया शशिकांत सरसंबे हिने दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. तिने ९३.६० टक्के गुण मिळवून अचलेरच्या विद्या विकास हायस्कूल या शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला आहे.
आयुष्य काय असते हे तिला माहीत नव्हते अशा वेळी दुःखाचा डोंगर कुटुंबावर कोसळला. श्रेयाचे वडील शशिकांत सरसंबे यांचे निधन झाले होते. कर्ता पुरुष अचानक निघून गेल्यावर मोठे संकट तिच्या घरावर आले होते. तिच्या आईने स्वतःला धीर देत जिद्दीने श्रेयाला शिकवले. आईचे कष्ट व जिद्द पाहून श्रेयाने परिश्रम घेत इयत्ता दहावीत ९३.६० टक्के गुण मिळवले. कै. शशिकांत सरसंबे व त्यांची पत्नी नागिनी सरसंबे या दाम्पत्याला दोन मुली. एक सध्या बारावीत शिकत आहे. श्रेया दहावी उत्तीर्ण झाली आहे. कै. शशिकांत सरसंबे यांना शिक्षणाची खूप आवड होती. दोन्ही मुलींनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे, असे ते नेहमी स्वप्न बघायचे. त्यांचीच प्रेरणा घेऊन श्रेयाने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. जिद्दीने मिळविलेले यश, आईने मुलीसांठी केलेले कष्ट पाहून विद्या विकास हायस्कूल व फिनिक्स फाउंडेशन अचलेर तसेच ग्रामस्थासह परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पालक आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनानेच यश
श्रेया सरसंबे याबाबत बोलताना म्हणाली की, या यशात माझ संपूर्ण परिवार माझे आई - वडील यांनी केलेले कष्ट पाहून व त्यांची प्रेरणा मला अभ्यासामध्ये प्रोत्साहन वाढवली. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त मी दररोज पाच तास अभ्यास करीत होते. जिद्दीने अभ्यासात सातत्य ठेवले. पेपर सोडवण्याचे वेळेचे नियोजन केले. ज्यांनी आम्हाला हे यश मिळविण्यासाठी खऱ्या अर्थाने मार्ग दाखवले व ते सत्यात येण्यासाठी आमच्याकडून अथक परिश्रम करून घेतले त्या शिक्षकांमुळे व त्यांनी घेतलेले अनेक सराव परीक्षांमुळे मी नियमित व अभ्यासामध्ये सातत्य ठेवले. म्हणूनच मला हे यश मिळवता आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.