आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरवा झेंडा:तलाव पुनरुज्जीवनासाठी प्रचार मोहिमेस हिरवा झेंडा

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी नीती आयोग, भारतीय जैन संघटना आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने प्रचार मोहिमेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वाहनास हिरवी झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यामधील लघु सिंचन साठवण तलाव, पाझर तलाव यामधील गाळ काढून तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी निती आयोगाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांनी आपल्या हद्दीतील तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, जास्तीत जास्त गाळ काढावा असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. आठ तालुक्यांमध्ये या मोहिमेच्या प्रचारासाठी दोन गाड्या प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत.

गाळ मुक्त तलाव आणि गाळ युक्त शेती हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही मोहीम जिल्हाभरात राबवली जात आहे. या बाबत पार पडलेल्या बैठकीला भारतीय जैन संघटनेचे पुणे (वाघोली) येथील मुख्य व्यवस्थापक अशोक पवार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अभिजीत मैदाड, जिल्हा समन्वयक दत्तात्रय पवार, भुजंग पाटील यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...