आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी (ता.सहा) सकाळपासून उमरगा पालिकेसमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी राजकीय, सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांनी गर्दी केली होती. मंगळवारी सकाळी आठ वाजता दिंगबर भालेराव, कमलाकर सुर्यवंशी आदींनी सामूहिक बुध्दवंदना केली. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने समता सैनिकांनी मानवंदना दिली.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती हरिश डावरे, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील, प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भालेराव, विजय वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड, धम्मचारी प्रज्ञाजीत, धम्मचारी विबोध, भीमराष्ट्र ग्रूपचे सचिन माने, सचिन पाटील, जिजाऊ बिग्रेडच्या रेखाताई पवार, संभाजी ब्रिगेडचे आण्णासाहेब पवार, पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. गोविंदराव गायकवाड, यांच्यासह विविध पक्ष, संघटना व बहुजन समाजबांधवांनी अभिवादन केले.
शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, आदर्श महाविद्यालय, जिल्हा परिषद प्रशाला, भारत विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, श्री महात्मा बसवेश्वर विद्यालय, आदर्श विद्यालय, शरणाप्पा मलंग विद्यालय या सह विविध शाळेत महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले.याप्रसंगी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होेते.
पुस्तक विक्री व प्रबोधन कार्यक्रम
महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुतळा परिसरात सम्राट अशोक कलापथक कलदेवनिंबाळा, राहुल कलापथक दाळींब, जय भिम कलापथक उमरगा यासह विविध कलापथकातील कलावंतानी भिम गीताच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाने डॉ.आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. दिवसभर पुस्तक विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पुस्तके खरेदी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.