आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:परंडा शहरात अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

परंडा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम निळ्या ध्वजाचे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मान्यवराच्या हस्ते वाटप करण्यात आले तसेच मातंग समाजाचे जेष्ठ नेते व वसंतराव लोंढे यांना भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी सतीश कसबे, संजयकुमार बनसोडे,तानाजी बनसोडे, राहुल बनसोडे, लक्ष्मीकांत बनसोडे, माजी नगरसेवक रत्नकांत शिंदे आदी उपस्थित होते.

रिपाइंच्या वतीने अभिवादन
येथील रिपाइं आठवले गट यांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली.प्रतिमेचे पूजन रिपब्लिकन पक्षाचे राज्य चिटणीस संजयकुमार बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सतीश कसबे, रत्नकांत शिंदे, संजय शिंदे, भाग्यवंत शिंदे, फकीर सुरवसे, आकाश बनसोडे, जयराम साळवे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...