आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापरिनिर्वाण दिन:डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हयात सर्वत्र अभिवादन

कळंब2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कळंब तालुक्यात विविध ठिकाणी करण्यात आले. शहरातील बालोद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सामाजिक न्याय विभाग मराठवाडा अध्यक्ष संजय कांबळे, रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा सचिव बंडुभाऊ बनसोडे, भाजपाचे सतपाल बनसोडे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल हजारे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष शिवाजी सिरसट, माजी नगरसेवक सुनील गायकवाड, रिपाइ (ए) तालुकाध्यक्ष किशोर वाघमारे, पत्रकार राहुल हौसलमल, सुनील गायकवाड, संजित मस्के, राजाभाऊ गायकवाड, सतपाल बचुटे, प्रमोद ताटे, माणिक गायकवाड, सुमित रणदिवे, दिलीप कसबे, भाऊसाहेब कुचेकर, मयुर सिरसट, गौतम सिरसट, सागर बचुटे आदी उपस्थित होते.

पाथर्डी
पाथर्डीच्या जिल्हा परिषद शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील सहावी वर्गातील विद्यार्थ्यांची बालसभा आयोजित करण्यात आली होते. या बाल सभेत विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनकार्यावर भाषणे केली. शिक्षकांनीही विचार मांडले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, शिक्षक राजेंद्र पवार, शिक्षिका आशा पवार ,मनिषा पवार ,सुरेखा भावले या सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ज्ञानदा पिंगळे हिने तर आभार अनिकेत पवार या विद्यार्थ्याने मानले. बालसभा यशस्वी करण्यासाठी इयत्ता सहावी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

कळंबमध्ये अभिवादन
सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक तथा प्राचार्य जे.डी. कुपकर व उपप्राचार्य डॉ. मीनाक्षी शिंदे भवर यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. मीनाक्षी शिंदे भवर यांनी आपले विचार मांडले. तसेच विद्यालयातील सिद्धी सावंत, पृथ्वीराज जाजू , अपूर्वा इटकर, श्रावणी माने, समृद्धी उगलमुगले, अनन्या कांबळे, समृद्धी बारटक्के , हुजेफ तांबोळी, धनश्री माने,पूजा गायकवाड, प्राणदा भडंगे, वैष्णवी मोहिते,अपेक्षा इटकर, आदित्य गायकवाड यांनी आपले विचार मांडले. यावेळी सांस्कृतिक विभागाचे काकासाहेब मुंडे, परमेश्वर मोरे, ज्ञानेश्वर तोडकर, जीवनसिंह ठाकूर यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मस्सा खं
तालुक्यातील मस्सा (खं) येथे सकाळी बुध्द वंदना तसेच प्रतिमेसमोर दिप प्रज्वलन करुन समाजबांधवासह गावातील नागरिकांनी आदरांजली वाहिली. यावेळी सतीश शिंदे, विष्णु,बांगर, अक्षय माळी,त्रिंबक कचरे, नितीन सावंत,रसुल तांबोळी, व्यकटेश थोरात, राजेंद्र शिंदे,नंदकुमार शिंदे, संदिप वरपे, यशपाल शिंदे बि.डी.शिंदे कल्याण शिंदे गौतम घोडके आदी उपस्थित होते.

उमरगा जि.प. हायस्कूल
जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे, क्रीडा शिक्षक बाबासाहेब जाधव, बशीर शेख, विद्यानंद सुत्रावे, बलभीम चव्हाण, सदानंद कुंभार, सांस्कृतिक विभाग प्रमुख सरिता उपासे, सोनाली मुसळे,शिल्पा चंदनशिवे, ममता गायकवाड यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...