आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्याच्या माध्यमातून आपले मत:क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

उमरगा4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेमाने प्रेरित सामाजिक समतेसाठी महापुरुषांच्या समतावादी विचाराना स्वंयप्रेरीत होवुन त्यांनी केलेले कार्य आज युवकांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. महामानवांचे कार्य व विचार तळागळापर्यंत पोहोचविण्याचा वसा घेण्याची गरज आहे, असे मत पोलीस पाटील महेशंकर पाटील यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील एकुरगा ग्रामपंचायत कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त बुधवारी (०३) आयोजित केलेल्या कार्यक्रमात पाटील बोलत होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी भास्कर वैराळे, ग्रापं कर्मचारी आदम मुर्शद, नूरशहा लालशहा मुर्शद यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री वैराळे म्हणाले की, संपुर्ण आशिया खंडात ज्या ब्रिटीश साम्राज्याचा सुर्य मावळत नव्हता तो सुर्य सातारा, सांगली जिल्हात मावळुन दाखविणारे क्रांतीसिंह नाना पाटील होय. अण्णाभाऊ साठे यांनी स्वयंप्रेरीत होऊन साहित्याच्या माध्यमातून आपले मत, विचार आपला विद्रोह समाजासमोर मांडला. आदम मुर्शद यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...