आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:महाराजा यशवंतराव होळकर यांना जयंतीदिनी अभिवादन

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात राजमाता युवा संघटनेच्या वतीने महाराजा यशवंतराव होळकर यांची २४६ वी जयंती देवघर धनगर समाजमंदिर सभागृहात शनिवारी (दि.३) उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी राजे यशवंतराव होळकर प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शक जालिंदर सोनटक्के, राजमाता संघटनेचे अध्यक्ष सतीश घोडके, उपाध्यक्ष प्रवीण घोडके, सचिव ‌‌रवी घोडके, धनराज घोडके, दिलिप घोडके, बालाजी घोडके, मारोती घोडके, अरुण गडदे आदी उपस्थित होते. राजे यशवंतराव होळकर यांचा जन्म ३ डिसेंबर १७७६ मध्ये झाला. पित्याचे नाव तुकोजीराव होळकर, त्यावेळी होळकर समाजाचा प्रभाव खूप होता. पण त्यांची ही समृद्धी काही लोकांच्या डोळ्यांत खुपत होती. त्यामध्ये ग्वालियरचे शासक दौलतराव सिंधियाही होते. होळकर साम्राज्याची समृद्धी त्यांना बघवत नव्हती, म्हणून त्यांनी यशवंतरावांचे भाऊ म्हणजे मल्हारराव यांच्या हत्येचा कट रचून ठार केले. भावाच्या अचानक मृत्यूमुळे यशवंतराव हळहळले, पण त्यांनी लवकरच स्वतःला सावरले, १८०२ ला झालेल्या युद्धात त्यांनी पुण्याच्या पेशवा बाजीराव द्वितीय व सिंधिया यांच्या संयुक्त सेनेला नमवले आणि तेथूनच खरी शौर्याची पताका फडकली.

यावेळी राजमाता युवा संघटनेचे सदस्य व समाजबांधव उपस्थित होते. सतीश घोडके यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. उस्मानाबादेत झालेल्या कार्यक्रमास श्रीकांत तेरकर, लिंबराज डुकरे, श्रीकांत देशमुख, संतोष वतने, अशोक गाडेकर, संभाजी गुंडरे, बालाजी वगरे, राहुल गवळी, रवी देवकते, विकी आंधारे, रवी भोसले, इंद्रजीत तेरकर, गणेश एडके, सुरेश शिंदे आदींची उपस्थिती होती.

खरा इतिहास लोकांसमोर आला नाही:डॉ.संतोष पाटील ऐतिहासिक दस्तावेज लिहिणाऱ्या लोकांनी शूरवीर यशवंतराव होळकरांचा खरा इतिहास लोकांसमोर आणला नाही, असे प्रतिपादन डॉ. संतोष पाटील यांनी होळकर यांच्या जयंतीनिमत्त बोलताना केले.

उस्मानाबादेतील अहिल्यादेवी होळकर चौक येथे शनिवार दि. ३ डिसेंबर रोजी यशवंतराव होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डाॅ.संतोष पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर डुकरे यांनी केले.तर आभार नरसिंह नेटकरी व सचिन चौरे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...