आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा संत रोहिदास महाराज यांनी आपले आयुष्यभर सर्वांना माणूस म्हणून एकत्र येण्याचे आवाहन करत समतेचा संदेश दिला. धर्म, जात-पात विरहित समाज रचना व्हावी हे त्यांच्या विचारातून जाणवते. या विचारांची सद्यस्थितीत गरज असून आचरण करण्याचे आवाहन केले, त्या संत रोहिदास महाराज यांची जयंती रविवारी (दि ५) आष्टा जहागीर येथे साजरी करण्यात आली. त्यांनी गरिबीचे चटके सोसत समाजाला ज्ञान दिले. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बरोबरीचे संत रोहिदास महाराज हे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते. निजामकाळात देशभरामध्ये इस्लामी धर्म असताना सुद्धा अनिष्ठ रुढी परंपरा,अस्पृश्यता विरुद्ध बंड पुकारुन आपण सर्व ईश्वराचे लेकरे आहोत अशी शिकवण देत होते, असे प्रतिपादन शालेय शिक्षण समितीचे माजी सभापती अशोकराव गायकवाड यांनी व्यक्त केले.
प्रारंभी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रा. सचिन गायकवाड,अॅड सुशील शिंदे, बसवराज कांबळे, गणेश माने, सुखदेव कांबळे, रोहिदास गायकवाड, मारुती गायकवाड,आकाश कांबळे. बालाजी जमादार, जिवन सुर्यवंशी,अजय सुर्यवंशी, नंदा कांबळे, लिंबाबाई कांबळे, कोमल जमादार,पुष्पा कांबळे, सरुबाई कांबळे, काशिबाई मोरे, अरुण कांबळे, बळीराम कांबळे उपस्थित होते.
शेळका धानोरा
कळंब तालुक्यातील शेळका धानोरा येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव तथा नेहरू युवा मंडळ कळंबचे सचिव कमलाकर शेवाळे यांनी संत शिरोमणी रोहिदास महाराजांचे विचार ,त्यांच्या कार्यावर थोडक्यात विचार मांडून प्रास्ताविक केले. या कार्यक्रमासाठी बब्रुवान शेवाळे, विठ्ठल शेवाळे, नवनाथ शेवाळे , ज्ञानेश्वर शेवाळे ,बालाजी शेवाळे अरविंद शेवाळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मस्सा खं व सालेगाव येथे संत रोहिदास जयंती साजरी
कळंब। तालुक्यातील मस्सा (खं) येथे संत रोहिदास यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपसरपंच संदीप तांदळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले, . यावेळी उपसरपंच संदीप तांदळे, ग्रा.पं.माजी सदस्य अक्षय माळी,संभाजी वरपे दत्तात्रय राऊत, धनंजय ओव्हाळ,नितीन तांदळे, पोलीस पाटील भास्कर शिंदे,जालिंदर किलचे, लालासाहेब शिंदे उपस्थित होते. लोहारा तालुक्यात लोहारा तालुक्यातील सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपसरपंच हुसेन शेख, ग्रां. पं. सदस्य मनोज देशपांडे, किरण पाटील, शिपाई बबन बाबर, संगणक परिचालक अमोल कांबळे, विशाल बडुरे, तानाजी पाटील आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.