आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजच्या धकाधकीच्या जीवनात भारतीय संस्कृतीचा विसर पडत आहे संस्कृती जोपासण्याचे महान कार्य क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून केले तेच विचार आजच्या तरुण पिढीने स्वतः मध्ये अंगीकृत करावे असे प्रतिपादन विद्याभवन हायस्कूलच्या उपक्रमशील शिक्षिका तथा इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा राजमती तीर्थकर यांनी केले.
कळंब शहरातील भैरवनाथ निसर्ग मंडळ संचालित डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ अध्यापक विद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ जयंतीनिमित्त प्रा.मोहिनी शिंदे-चोंदे यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाचा कार्यक्रम झाला.
यावेळी सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माजी प्राचार्या मनोरमा शेळके-भवर,विद्याभवन विद्यालयाच्या उपक्रमशील शिक्षिका राजमती बचाटे- तीर्थकर,भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने,भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे हे प्रमुख पाहुणे होते. पुढे बोलताना राजमती तीर्थकर म्हणाल्या की,आजच्या पिढीने शिक्षण घेत असताना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचे केवळ वाचन करून चालणार नाही तर त्यांचे आचरण झाले तरच खऱ्या अर्थाने जयंत्या पुण्यतिथी साजरा केल्याचे सार्थक होईल.
या कार्यक्रमात भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतीश मातने,विद्यालयातील सीमा चोरघडे,वैष्णवी सुरवसे, संचिता चोरघडे,साक्षी सोनवणे,श्रीकांत धाकतोडे, गोविंद वावरे,तुकाराम मिरगिणे,गिरीधर वावरे ह्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर काळे,प्रास्ताविक गिरीधर कवडे तर आभार सुप्रिया चव्हाण यांनी मानले.
याप्रसंगी भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्रा.श्रीकांत पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अविनाश घोडके, निदेशक सागर पालके,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक विनोद जाधव,अतिश वाघमारे,विनोद कसबे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. शहर आणि जिल्हयात सर्वच शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय कार्यालयांमध्ये अभिवादन करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.