आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरिकीर्तन:उस्मानाबादमध्ये श्री संत सेना महाराजाना अभिवादन ; शहरातील बांधवांना महाप्रसादाचे वाटप

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय नाभिक महासंघ जिल्हा उस्मानाबाद यांच्या वतीने श्रीसंत सेनाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम नरहरी महाराज मंदिर तांबरी विभाग उस्मानाबाद या ठिकाणी झाला. या कार्यक्रमात सकाळी ह.भ.प.राजेंद्र ताटे महाराज यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम झाला. दुपारी बारा वाजता गुलाल उधळण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर महाआरती झाली. नंतर भजन गायनाचा कार्यक्रम झाला. यानंतर शहरातील बांधवांना महाप्रसाद देण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष मंगलताई शिराळे, राज्य कार्यकारणी लक्ष्मणराव धाकतोडे हरिश्चंद्र गवळी, बाळासाहेब मंडलिक, दिलीप राऊत पुरुषोत्तम माने, मधुकर हुजर, प्रकाशराव शिराळे, रमेश घागरे, दिलीप गोरे, धनंजय झेंडे, सौ.वनमाला माने, सौ.शेंद्रेताई, त्याच बरोबर अनेक मान्यवरांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्तविक लक्ष्मणराव धाकतोडे यांनी केली. यावेळी राष्ट्रीय नाभिक महासंघाची पुढील दिशा व माजाच्या हितासाठी राबविण्यातयेणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. पकोरोना कालावधीमध्ये राष्ट्रीय नाभिक महासंघ उस्मानाबादच्या वतीने उस्मानाबाद शहरातील गोरगरीब नाभिक व्यवसाय बांधवांसाठी वेळोवेळी करण्यात आलेले किराणा व भुसार मालाच्या भरीव मदतीचा उल्लेख ही ह.भ.प. ताटे महाराज यांनी माहिती देवून कार्यकर्त्याचे कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...