आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुळजापूर:तुळजाभवानी मंदिरात देशी-विदेशी फुलांच्या सजावटीतून कोरोना योद्ध्यांना अभिवादन

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात देशी-विदेशी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली. यासाठी ४० हून अधिक कामगारांनी ४८ तास परिश्रम घेतले.
  • अडीच हजार किलो फुले, 40 हून अधिक कामगारांनी 48 तास परिश्रम घेतले

पुणे येथील देवीभक्त आर. आर. किराड परिवाराच्या वतीने आश्विन पौर्णिमेच्या दिनी तुळजाभवानी मंदिरात देशी-विदेशी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली. या वेळी फुलांच्या सजावटीतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.

किराड परिवाराने या वर्षी घटस्थापना, ४ थी माळ, दुर्गाष्टमी, महानवमी आणि पोर्णिमा या ५ दिवशी सजावट केली. देविचा मुख्य गाभारा, पिंपळाचा पार, राजे शहाजी महाद्वार, राजमाता जिजाऊ महाद्वार, प्रदक्षिणा मार्गासह संपूर्ण मंदिरात करण्यात आलेली आकर्षक सजावट लक्ष वेधून घेत होती. तब्बल ४० कामगार ४८ तासापासून अधिक काळ मंदिरात सजावटीचे काम करीत होते.

अडीच हजार किलो फुले, ४० कामगार, ४८ तास

> ऑरेंज झेंडू -६०० किलो > पिवळा झेंडू - ६०० किलो > व्हाइट शेवंती - ८०० किलो > पिवळी शेवंती - १०० किलो > अष्टर - २०० किलो > अँथुरिअम फ्लॉवर स्टिक - १००० > पर्पल ऑर्किड - २५ बंडल > व्हाईट ऑर्किड - १० बंडल > तुकडा रेड गुलाब तुकडा - ५० किलो > मिक्स गुलाब - २५० बंडल > कार्नेशिअन - ५० बंडल > जिप्सो - २० बंडल > ग्रीनरी - १०० बंडल > काळा घास - ४०० बंडल > ४० कारागीर ४८ तास

कोरोना योद्ध्यांना अभिवादन

यावेळी महाद्वारनजीक डाॅक्टर, पोलिस, सफाई कामगार, आरोग्य सेवक, शासकीय अधिकारी आदींची फुलांच्या माध्यमातून प्रतिमा साकारून त्यांनी कोरोनाकाळात केलेल्या अतुलनीय कामाबद्धल तसेच यादरम्यान ज्यांचा मृत्यू झाला अशा कोरोना योद्ध्यांना अभिवादन करण्यात आले. याशिवाय पिंपळाच्या पाराजवळ रथाला जुंपलेले घोडे लक्ष वेधून घेत होते.