आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रमांचे आयोजन:उमरगा शहर व तालुक्यात लोकमान्य व लोकशाहिरांना अभिवादन

उमरगा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह तालुक्यात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीसह शाळा व विद्यालयात सोमवारी (०१) लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम घेवून अभिवादन करण्यात आले.

शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मध्यवर्ती कमिटीच्या वतीने साजरी करण्यात आली. भाजप तालुकाध्यक्ष कैलास शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर युवा नेते किरण गायकवाड अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रदेश कॉंग्रेस सचिव दिलीप भालेराव, प्रा किरण सगर,मनसे विधानसभा अध्यक्ष शाहूराज माने, अनिल सगर व इतर उपस्थित होते. डॉ चंद्रशेखर गायकवाड यांनी सूत्रसंचलन केले. शिवाजीराव गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. दिलीप गायकवाड यांनी आभार मानले.

मलंग विद्यालय
शहरातील कै. शरणप्पा मलंग विद्यालयात साहित्यसम्राट व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सोमवारी साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक अजित गोबारे अध्यक्षस्थानी होते.यावेळी कुमारस्वामी प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापक कविराज रेड्डी, मराठी विभागप्रमुख अगतराव मुळे उपस्थित होते. प्रारंभी शरणप्पा मलंग यांचे पुतळ्यास अभिवादन व भारतीय स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भारत माता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सामूहिक भारत मातेचे गीत सादर केले. अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अगतराव मुळे यांनी मार्गदर्शन केले. राजकुमार जाधव, सतीश कटके, विवेकानंद पाचंगेे यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. परमेश्वर सुतार यांनी सूत्रसंचलन केले. परमेश्वर कोळी यांनी आभार मानले.
आदर्श विद्यालय

आदर्श विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रतिमेचे प्राचार्य सोमशंकर महाजन यांच्या हस्ते पूजन झाले. यावेळी श्रीमती बेबीसरोजा स्वामी, पर्यवेक्षक बी एम पाटील, निर्मला चिंकुद्रे, तात्याराव फडताळे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.जि.प. शाळा शहरात जिल्हा परिषद प्रशालेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक पद्माकर मोरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख सरिता उपासे, बाबासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बशीर शेख, धनराज तेलंग, चंद्रशेखर पाटील, बलभीम चव्हाण सदानंद कुंभार, संजय रुपाजी, सोनाली मुसळे, ममता गायकवाड, शिल्पा चंदनशिवे, सुनिता राठोड उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विचार मांडले.

कोरेगाव जि.प.शाळा
तालुक्यातील कोरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथ शाळेत लोकशाहीरअण्णाभाऊ साठे यांची जयंती व बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी उमाचंद्र सूर्यवंशी, लक्ष्मी वाघमारे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन कण्यात आले.यावेळी लक्ष्मी वाघमारे यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली.
एकुरगा येथे अभिवादन तालुक्यात एकुरगा येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त ध्वजारोहण व प्रतिमा पूजन करत जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अण्णाभाऊ नगर येथे पोलीस पाटील महेशंकर पाटील यांच्या हस्ते ध्वजरोहन आणि बसवेश्वर करके, नवनाथ कांबळे, विजय कांबळे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जयंती समितीचे अध्यक्ष संभाजी कांबळे,उपाध्यक्ष विजय कांबळे,सचिव खंडू कांबळे,सदस्य विशाल कांबळे, बळी कांबळे, राहुल कांबळे, कमलाकर कांबळे, महादेव कांबळे, सचिन कांबळे, सुनिलकुमार शिंदे, दयानंद कांबळे, सुशांत कांबळे, ओम करके आणि प्रभाकर गायकवाड, बबन गायकवाड आदी उपस्थित होते.

जकेकूर ज्ञानप्रबोधिनी
जकेकूर येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जंयती साजरी करण्यात आली. प्रारंभी मुख्याध्यापक व्ही टी घोडके यांच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सहशिक्षक संतोष कांबळे, मुख्याध्यापक घोडके यांनी महापुरुषाच्या जीवन कार्याची माहिती दिली. सहशिक्षक प्रदिप समाने, संतोष बिराजदार, संजय बिराजदार, आय बी सय्यद, एम सी स्वामी यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...