आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागृती:तुळजापुरात रस्ता सुरक्षा रॅलीवेळी मार्गदर्शन ; मिलींद निकम यांचा हस्ते शुभारंभ ​​​​​​​

तुळजापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सोमवार (दि. ०७) सायंकाळी रस्ता सुरक्षा रॅली काढण्यात आली. यावेळी रस्ता सुरक्षे संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तुळजापूर तालुका विधी सेवा समिती, तुळजापूर पोलीस व बार असोसिएशन तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “रस्ता सुरक्षा जागृती रॅलीचे“ आयोजन करण्यात आले. महाद्वार समोर न्या. मिलींद निकम यांचा हस्ते वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रॅली चा शुभारंभ करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॅा. सई भोरे पाटील, पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद, व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे, विधीज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. दत्तात्रय घोडके यांचा सह पोलिस कर्मचारी, विधीज्ञ सहभागी झाले होते.भवानी रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गोलाई, जुन्या बसस्थानका समोरून पोलीस ठाण्यात रॅली चा समारोप करण्यात आला.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील, न्या. निकम यांनी मार्गदर्शन केले तर पोलीस निरीक्षक काशिद यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...