आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रध्वज हाताळणे बाबत मार्गदर्शन:अंभी पोलिस स्टेशनच्या वतीने शाळांमध्ये मार्गदर्शन

परंडा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कुक्कडगाव येथील कल्याणी माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेत आझादी का अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत अंभी पोलीस स्टेशनच्या वतीने राष्ट्रध्वज हाताळणे बाबत मार्गदर्शन तसेच हर घर तिरंगा बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन प्रोत्साहन देण्यात आले.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक नवनित कावट, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर,पोहेका. लक्ष्मण माने,पोलीस नाईक फिरोज शेख, महिला पोलीस अंमलदार सुनीता पवार आदी उपस्थित होते.यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक आशीष खांडेकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, समाजातील प्रत्येक माता-भगिनींना राज्य घटनेमुळे सुरक्षित जगण्याचा अधिकार मिळाला आहे यासाठी त्यांचे हक्क व कायदे या बाबत जनजागृती करून गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस सतर्क आहेत. डिजिटल व इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गुन्हेगारी क्षेत्र पासून दुर राहिले पाहिजे. पर्यावरण अबाधित राहावे यासाठी जास्तीत जास्त झाडे लावून त्याचे जतन करणे ही काळाची गरज आहे.पोलीस दीदी व पोलिस काका यांच्या माध्यमातून पोलिसांविषयी असलेले समज-गैरसमज,वाहतुकीचे नियम, बाल लैंगिक अत्याचार, व्यसनमुक्ती व गुडटच बॅडटच तसेच कायदेविषयक ज्ञान विद्यार्थ्यांना शिक्षकांना व पालकांना सांगितले.

पोलीस दलातील सध्या वापरात असलेले स्वयंचलित हत्यारे याबाबत विद्यार्थ्यांना योग्य ती माहिती देण्यात येऊन ती त्यांना हाताळण्यासाठी देण्यात आली. कार्यक्रमासाठी कल्याणी विद्यालय येथील मुख्याध्यापक हनुमंत शिरसागर, संस्थाचालक बाळासाहेब गटकळ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...