आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:विज्ञान शाखा दीक्षारंभ सोहळ्यात मार्गदर्शन

उमरगा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविद्यालयीन जीवन सर्वांच्या आयुष्यातील चिरस्मरणीय राहणारा कार्यकाळ. विद्यार्थी म्हणून शिकणारा प्रत्येकजण माणूस म्हणून याच काळात घडतो. विज्ञान शाखेचा विद्यार्थी कल्पनाविश्वात रमणारा नसून वास्तवाचे भान ठेवून जगतो म्हणूनच जीवनात त्याचा हाच दृष्टिकोन यशस्वी करतो असे प्रतिपादन विज्ञान शाखा दीक्षारंभाप्रसंगी उपप्राचार्य डॉ. डी. व्ही. थोरे यांनी केले.

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात विज्ञान शाखेचा दीक्षारंभ सोहळा सोमवारी (१२) उत्साहात पार पडला. त्यावेळी उपप्राचार्य डॉ. थोरे बोलत होते. यावेळी उपप्राचार्य डॉ संजय अस्वले उपस्थित होते. बी एस्सी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध विभाग, प्राध्यापक, उपलब्ध सुविधा, संसाधने, शिस्तपालन आदींची माहिती करून देण्यास व विद्यार्थ्यांच्या मनामधील भीती दूर करून मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होण्यास हा उपक्रम राबविला जातो.

यावेळी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. एस. इंगळे, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. बी. के. लबडे, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सी. व्ही. पवार, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. विनोद देवरकर, संगणकशास्त्र विभाप्रमुख डॉ. एस. एस. रेवते व इतर प्राध्यापक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...