आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:फार्मसी महाविद्यालयात ऊर्जा संसाधनाबाबत मार्गदर्शन‎

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत‎ कॉलेज ऑफ फार्मसी‎ महाविद्यालयात पेट्रोलिअम संवर्धन‎ संशोधन संस्थेचे ऊर्जा‎ लेखापरीक्षक केदार खमितकर यांनी‎ शुक्रवारी (०३) ऊर्जा संसाधने व‎ संवर्धन विषयावर मार्गदर्शन केले.‎ यावेळी किरण खमितकर उपस्थित‎ होते.‎ ऊर्जा लेखापरीक्षक केदार‎ खमितकर यांनी विद्यार्थ्यांसोबत‎ चर्चा करून मार्गदर्शन करताना‎ म्हणाले की, सूर्य हा उर्जेचा‎ अपारंपरिक स्रोत आहे. त्यापासूनच‎ प्रेरणा घेऊन मानवाने उर्जेची निर्मिती‎ केली आहे. त्यामुळे उर्जेची बचत‎ हेच उर्जेचे संवर्धन होय. सध्या‎ खनिज तेल, नैसर्गिक वायू आदी‎ ऊर्जा संसाधने उपलब्ध आहेत.‎ काळानुरूप ऊर्जेचे स्वरूप, स्त्रोत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बदलत आहेत. येणाऱ्या काळामध्ये‎ संसाधनांचा गैरवापर टाळावा व‎ बचत करावी. नवनवीन पर्यावरण‎ आणि प्रदूषण विरहीत संसाधनाचा‎ वापर करावा. समाजात ऊर्जा‎ संवर्धन विषयक जनजागृती‎ करण्यात यावी. जास्तीत जास्त सौर‎ ऊर्जेचा वापर करण्यात यावा.

याची‎ विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरापासूनच‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सुरुवात करावी. या ऊर्जा‎ संवर्धनाचा पुढील पिढीसाठी एक‎ आदर्श स्थापित करावा. दृकश्राव्य‎ माध्यम याचा वापर करून ऊर्जा‎ संवर्धनाचा प्रचार व प्रसार करून‎ ऊर्जा संवर्धनाचे महत्व विविध‎ घटकांना पटवून देणे हा या‎ उपक्रमाचा भाग आहे.‎ ग्लोबल वॉर्मिंग सारख्या जागतिक‎ स्तरावरील गंभीर समस्येला सामोरे‎ जात असताना ऊर्जेचा‎ काटकसरीने, कार्यक्षमतेने वापर‎ होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी‎ ऊर्जा संवर्धनाविषयी सर्व‎ घटकांमध्ये जनजागृती होणे‎ आवश्यक आहे. यावेळी‎ विद्यार्थ्यांना उर्जा बचत आणि‎ संवर्धनाची शपथ देण्यात आली.

या‎ सूचनांचे पालन करावे‎ केदार खमितकर यांनी‎ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. किरण‎ खमितकर यांनी विद्यार्थ्यांना ऊर्जा‎ संवर्धन व संरक्षण शपथ देण्यात‎ आली. प्राचार्य महेश कदारे‎ अध्यक्षस्थानी होते. प्रा अजय‎ बेडदुर्गे, प्रा दयानंद शिंदे, प्रा वैष्णवी‎ इंडे, प्रा प्राजक्ता ननवरे, प्रा वैष्णवी‎ फुगटे आदी उपस्थित होते. यावेळी‎ सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी‎ आणि विद्यार्थी उपस्थित होते.‎

दैनंदिन जीवनात अशी‎ बचत करा‎
उर्जा संवर्धनाकरिता दैनंदिन‎ जीवनात काय करणे शक्य आहे,‎ याबाबत काही सूचनाही यावेळी‎ देण्यात आल्या. गरज नसेल तेंव्हा‎ विद्युत उपकरणे आणि दिवे बंद‎ करणे. वापरात नसेल तेंव्हा विद्युत‎ उपकरणांचे स्वीच बंद ठेवणे.‎ कॉलेज व घरात सुर्यप्रकाशाचा‎ जास्तीत जास्त वापर करणे.‎ घरातील आतील भिंतींना व छताला‎ फिक्कट रंग देणे.फ्रिजमध्ये बर्फ‎ साचु न देणे. वीजेच्या अति उच्च‎ मागणी काळात म्हणजेच सकाळी‎ सात ते अकरा व सायंकाळी सहा ते‎ दहा या वेळेत मोठ्या प्रमाणावर‎ वीज उपकरणांचा वापर टाळावा‎ आदी दैनंदिन जीवनातील ऊर्जा‎ बचती सुचना विद्यार्थ्यांना दिल्या.‎

बातम्या आणखी आहेत...