आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये अभियांत्रिकी शिक्षणानंतर करिअरच्या विविध संधी, या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी एसी इंजिनिअरिंग अकॅडमीचे कौशिक अगस्तीराज यांच्या लाईव्ह वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलताना कौशिक अगस्थीराज म्हणाले की, अभियांत्रिकी शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या संधी असून फक्त विद्यार्थ्यांनी थोडे परिश्रम घेतले पाहिजेत. अभियांत्रिकीच्या पदवीनंतर नंतर विद्यार्थ्यांना गॅझेटेड ऑफिसर ,स्टेट गव्हर्मेंट मध्येही अनेक उच्च पदावर नोकरी लागू शकते. तसेच कॅट ,आयसीएस, आयएफएस या परीक्षेमधूनही त्यांना अनेक संधी सहज उपलब्ध होतात. पदवी अभियांत्रिकी नंतर पुढील शिक्षण आयआयटी सारख्या नामांकित संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण घेता येते . परदेशामधून एम एस करता येते. तसेच संशोधन क्षेत्रातील बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर, डीआरडीओ इथेही जाण्यासाठी ज्या विविध स्पर्धा असतात याविषयी माहिती दिली .
राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय कंपनीमध्येही ५० लाखापेक्षा जास्त पॅकेज मिळेल अशा संधी सहज उपलब्ध होऊ शकतात. फक्त त्यासाठी असणाऱ्या परीक्षेची माहिती घेतली पाहिजे .यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की , विद्यार्थ्यांना महाविद्यालय नेहमीच विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी निर्माण करण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करून देत आहे. विद्यार्थ्यांनी या संधीची सुवर्णसंधी बनवली पाहिजे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. डी डी दाते यांनी केले. तर या वेबिनारसाठी डॉ .प्रशांत कोल्हे ,प्रा.सुजाता गायकवाड प्रा.शितल पवार उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.