आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपण सर्वच बॉम्बला घाबरतो. परंतु आपल्या प्रत्येकाच्या घरात एक बॉम्ब आहे. एक अतिशय पोटेन्शियल बॉम्ब. तो म्हणजे घराघरात वापरला जाणारा एलपीजी सिलिंडर. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजेच एलपीजी. या गॅस मध्ये ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे दोन वायू मिश्र स्वरूपात असतात. पेट्रोलियम रिफायनरी मध्ये हे वायू तयार होतात, असे सेफ्टी डिव्हाइसचे प्रमुख प्रतिनिधी कार्तिक पाटील यांनी सांगितले.
शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तालुक्यातील कोरेगाववाडी येथील कॉलेज ऑफ फार्मसी येथे गुरूवारी (२८) घरगुती गॅस सुरक्षा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सेफ्टी डिव्हाइसेस प्रतिनिधी पाटील बोलत होते.
प्राचार्य महेश कदारे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रा. अजय बेडदुर्गे, प्रा किरण पांचाळ उपस्थित होते. पुढे बोलताना श्री पाटील म्हणाले की, आपल्या प्रत्येकांच्या घरी येणाऱ्या गॅस सिलिंडरमध्ये कम्प्रेस्ड स्वरूपात असल्याने स्टेबल राहतात. एक लिटर कम्प्रेस्ड गॅसचे पूर्ण गॅसमध्ये रूपांतर करण्यात आल्यास साधारण २७०लिटर गॅस इतके आकार व्यापणारा वायू तयार होतो.
एका घरात दूध उतू जाऊन ज्योतीवर सांडले अन ज्योत विझली. परंतु शेगडीचे बटन चालू असल्याने गॅस लीक होत राहिला. दारे, खिडक्या बंद असल्यामुळे गॅस पूर्ण घरात भरून गेला. दोन स्त्रिया घरात शिरल्या. तिने चटकन किचनमध्ये जाऊन लाईट लावला क्षणात मोठा भडका उडून तिघीही भाजल्या. कुणालाही वाचवता आले नाही. त्यामुळे स्वयपाकघरात काळजी घेणे आवश्यक आहे.
अशी काळजी घ्या
गॅस सिलिंडर घेताना सिलिंडरच्या रिंगवर सिलिंडरची तपासणी तारीख लिहिलेली असते ती पाहून घ्यावे, सील तोडून सेफ्टी कॅप काढून हाताची करंगळी गॅस सिलिंडरच्या तोंडात घालून आत व्हॉल्व आहे की नाही पहा, असायला हवी हे तुम्हाला जमत नसल्यास कर्मचाऱ्याला तपासण्यास सांगा व पुन्हा सेफ्टी कॅप लावूनच ठेवा. सिलिंडर जोडताना शेगडीची दोन्ही बटणे बंद करा, घरांच्या खिडक्या उघडून ठेवा, रेग्युलेटर बटण बंद करा. रिकाम्या सिलिंडरची सेफ्टी कॅप बंद करा. नव्या सिलिंडरची सेफ्टी कॅप काढून रेग्युलेटर बसवा. तो नीट बसल्याची खात्री झाल्यावर मगच रेग्युलेटर चालू करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.