आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:‘भाजप आपल्या गावी’तून लोकोपयोगी योजना, निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्याबाबत मार्गदर्शन

वाशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात ‘भाजप आपल्या गावी’ अभियान राबवण्याबाबत रविवारी (दि.५) तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची येथील भाजप कार्यालयात माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. स्थानिक लोकप्रतिनिधींपासून केंद्रातील भाजप सरकारने जनतेसाठी घेतलेले निर्णय व केलेल्या कार्याची माहिती गावोगावी पोहोचवण्याची रणनीती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगण्यात आली. लोकोपयोगी योजनांची माहिती, पीकविम्याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेला पाठपुरावा आदी माहिती सर्वसामांन्यांपर्यंत पोहोचवण्यास सांगण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष तथा वाशीचे उपनगराध्यक्ष सुरेश कवडे यांनी तालुक्यात हे अभियान प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी अॅड. कुलदीपसिंह भोसले, नगरसेवक भागवतराव कवडे, बळवंतराव कवडे, विकास पवार, संतोष गायकवाड व तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...