आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर गायडन्स सेल:चव्हाण महाविद्यालयामध्ये पोलिस भरतीबाबत मार्गदर्शन

लोहारा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात बुधवारी करिअर गायडन्स सेल मार्फत पोलिस भरतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर होते.

एम. एस. जगताप यांनी पोलिस भरतीची संधी व पूर्वतयारीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एन. आर. फुलमाळी यांनी सायबर गुन्हा व त्याविषयी असणारी जागरूकता या विषयावर मार्गदर्शन केले. सहायक पोलिस निरीक्षक एस. पी. काकडे यांनी व्यसनाधीनता, लैंगिक अत्याचार व वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन केले. सीआयएओ पूजा चव्हाण यांनी त्यांच्या करिअरमधील वाटचालीविषयी माहिती देत ऑनलाइन गुन्ह्यांविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी पूजा चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक सुनीलकुमार काकडे, पोलिस कर्मचारी एम. एस. जगताप, एन. आर. फुलमाळी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तौफिक कमाल यांनी तर प्रास्ताविक प्रा. महानंदा मोरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा. यशवंत चंदनशिवे, प्रा. व्यंकट चिकटे, प्रा. राजेंद्र पात्रे, प्रा. राजाराम निकम, प्रा. लक्ष्मण तौर, प्रा. व्यंकटेश घोडके, प्रा. अभिजित सपाटे, प्रा. राजपाल वाघमारे, प्रा. रुपाली कोटणुर, प्रा. प्रतीक्षा कदम, प्रा. स्वाती निकम, प्रा. साधना चव्हाण, प्रा. सपना चव्हाण यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.त. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत विमा काढून लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे.

योजनेंतर्गत खरीप ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर आदी पिकांचा विमा काढता येणार आहे. पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पेरणी, लावणीपूर्व नुकसानभरपाई निश्चित करणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा समावेश राहणार आहे. यात कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी असे घटक आहेत. नुकसान भरपाई मिळण्यासाठी विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून (नैसर्गिक कारणे व आपत्तीने नुकसान, ) ७२ तासांच्या आत विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी विभाग व महसूल विभागाला सूचना देणे गरजेचे आहे. दरम्यान, अनेक भागातील शेतकरी विमा भरण्यासाठी मुदत वाढून देण्याची मागणी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...