आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय लाभ:घरांच्या नोंदी घेण्यासाठी पं.स.कडून मागवले मार्गदर्शन

तेर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील गोदावरी विभागात अर्ध शतकापासून राहणाऱ्या नागरिकांच्या घराच्या नोंदी ग्रामपंचायत नमुना नं. ८ वर घेण्याची मागणी या भागातील नागरिकांनी करत ग्रा.प.मासिक बैठकीत विषय घेण्यात आला असून याबाबत पं.स.कडून मार्गदर्शन मागवण्यात आले आहे.

सरपंच नवनाथ नाईकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलै रोजी पार पडलेल्या बैठकीत या भागातील ग्रा.पं.सदस्य बाळासाहेब कदम व आशा विठ्ठल कोकरे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या भागात पिढ्यानपिढया वास्तव करून नागरिक राहतात. या लोकाकडे भूमीअभिलेखचे पी.आर.कार्ड, सनद टोच नकाशा आहे. परंतु, ग्रामपंचायतीच्या रेकाॅर्डला या जागेची कुठल्याही प्रकारची नोंद नाही. त्यामुळे या लोकांना शासकीय लाभ मिळत नाही. प्रधानमंत्री घरकूल योजना राबवण्यात येत असून केवळ ग्रामपंचायत ८ अ रेकाॅर्डला नोंद नाही. यामुळे घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. अशा आशयाचा विषय बैठकीत मांडला होता. त्यामुळे ग्रामपंचायतने गोदावरी विभागातील घराच्या नोंदी ग्रामपंचायत रेकाॅर्डला घेण्याबाबत पंचायत समितीकडे मार्गदर्शन मागवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...