आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत २५ जून ते १ जुलैदरम्यान कृषी संजीवनी मोहीम राबवण्यात येत आहे. यानुसार उस्मानाबाद तालुक्यातील वाणेवाडी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
तालुका तंत्रज्ञान समन्वयक नागेश उगलमुगले यांनी शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या औजार बँक व गोदाम योजना तसेच आत्मा अंतर्गत विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. कृषी सहायक वैभव लेणेकर यांनी राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेविषयी माहिती दिली. यावेळी कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय मोहिते, सरपंच जयश्री उंबरे, मीरा जाधव, आशा केसकर, सुरेखा उंबरे, उपसरपंच गोविंद उंबरे, प्रगतशील शेतकरी दीपक घेवारे, श्रीशैल्य केसकर, प्रदीप घेवारे, सुधाकर बरे, महादेव कदम, शत्रुघ्न उंबरे, महादेव गाढवे, पांडुरंग उंबरे, गणपती चव्हाण, मुकुंद उंबरे, मंगेश घेवारे, दत्तात्रय कदम व कृषीमित्र शिवराज घेवारे, शेतकरी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.