आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समारोप:शेळी, कुक्कुटपालन प्रशिक्षणात महिलांसह युवकांना मार्गदर्शन

उमरगा2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कृषी अनुभव चर्चासत्र, बंदिस्त शेळीपालन केंद्रास भेट

तालुक्यातील कलदेवनिंबाळा येथे कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर, पंचायत समिती उमेद व ग्रामपंचायत कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १६ ते १८ मार्च दरम्यान तीन दिवस घेण्यात आलेल्या शेळी व कुक्कुटपालन प्रशिक्षणाचा शुक्रवारी (दि.१८) समारोप करण्यात आला. दरम्यान सहभागी झालेल्या महिला, पुरुषांना विविध विषयांतील तज्ञांनी मार्गदर्शन केले.

ज्येष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले. लघुउद्योग, जोडधंदे हीच ग्रामीण भारताची अर्थव्यवस्था असून त्यास प्रोत्साहन द्यावे, असे मत सुराणा यांनी व्यक्त केले. ग्रामपंचायत सभागृहात प्रशिक्षण समारोप सरपंच सुनीता पावशेरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. उमेदचे तालुका व्यवस्थापक विवेक पवार, उद्योजक श्रावण रावणकुळे, उमेद कृषी व्यवस्थापक किशोर औरादे, मारुती सुरवसे यांच्या हस्ते सहभागी एकूण ३५ जणांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. प्रशिक्षणाच्या काळात शेळीपालनावर डॉ. विजयकुमार जाधव, गुंडू पवार यांनी मार्गदर्शन केले. कुक्कुटपालनावर विवेक पवार यांनी प्रशिक्षणात माहिती दिली. तुळजापूर कृषी विज्ञान केंद्र परिसरात सर्वच प्रकल्प, विभागाची माहिती घेतल्यावर कार्यक्रम समन्वयक डॉ. देशमुख, शास्त्रज्ञ, डॉ. वर्षा मरवाळीकर, डॉ. विजय जाधव, डॉ. आरबाड, हवामान शास्त्रज्ञ डॉ. नकुल हरवाडकर, डॉ. गणेश मंडलीक, डॉ. श्रीकृष्ण झगडे यांनी अोझोला खाद्य, हवामानशास्त्र, गृहविज्ञान, नॅडप, निंबोळी अर्क, पोषणबाग, वृक्षलागवड, शेती अवजारे उपकरणे व यंत्रे, शेळीपालन व कुक्कुटपालन आदींची माहिती देवून मार्गदर्शन केले. देवीदासराव पावशेरे यांनी सूत्रसंचालन केले. किशोर औरादे यांनी आभार मानले.

प्रत्यक्ष शेतकरी अभ्यास दौरा
प्रत्यक्ष शेतकरी अभ्यास दौरा घेण्यात आला. तावशीगड येथील बिराजदार यांच्या बंदिस्त शेळीपालन केंद्रास भेट देऊन विविध जातींच्या शेळी व बोकड आदी माहिती देण्यात आली. नळदुर्ग येथील गुंडू पवार यांच्या फार्म हाऊसवर कृषी अनुभव चर्चासत्र उपक्रम घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...