आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:गौर येथे ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’अंतर्गत मार्गदर्शन

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील गौर येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील-दुधगावकर यांच्या वतीने ‘एक तास राष्ट्रवादी’साठी हे अभियान राबवण्यात आले. याप्रसंगी शेतकऱ्यांसह तरुणांची लक्षणीय उपस्थिती होती. दुधगावकर यांनी पक्षाने केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कळंब तालुका उपाध्यक्ष रमेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी ग्रामपंचायत सदस्य जनार्दन लंगडे यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास वाघोलीचे नेते औदुंबर धोंगडे, भोसा येथील माजी उपसरपंच जाकीरभाई पटेल, जिक्राइल पटेल, वाहेद पटेल, रशीद पटेल, अख्तार पटेल, ग्रामपंचायत सदस्य नामदेव गाढवे, अमोल देशमुख, अमोल लंगडे, विजय लंगडे, जयसुनकुमार लंगडे, अजित माळी, दिपक माळी, गोविंद शेळके, अजय केसरे, सुनिल पवार उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा, पक्षाने शेतकरी व खेडेगावांसाठी केलेल्या उपाययोजनांबाबत संजय पाटील-दुधगावकर यांनी मार्गदर्शन केले. आभार अॅड. सुशीलकुमार लंगडे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...