आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विद्यार्थ्यांना प्रकल्प लेखनाविषयी मार्गदर्शन; उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये आयोजन

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व कला शाखेच्या वतीने बीए तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी (दि.२९) प्रकल्प लेखन कार्यशाळा घेण्यात आली.

प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव अध्यक्षस्थानी होते. डॉ. अनिल गाडेकर, श्रीशैल्य तोडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. गाडेकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बीए तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प लेखन हा शंभर गुणांचा अनिवार्य पेपर आहे. प्रकल्प लिहिताना विद्यार्थ्यांकडे चिकित्सक दृष्टिकोन असावा. विषयाची निवड कशी करावी, माहिती कशी मिळवावी, माहितीचे वर्गीकरण कसे करावे व निष्कर्ष कसे काढावे, सामाजिक शास्त्रात केले जाणारे संशोधन, हे सामाजिक समस्यांवर उपाय शोधणारे असावे. क्षेत्रिय अभ्यासावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा, आदी मार्गदर्शन केले.

तिसऱ्या सत्रात उपप्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प लेखनाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असणाऱ्या इंक्युब्युशन सेंटर विषयी माहिती दिली. प्राचार्य डॉ. जाधव यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त सोयी-सुविधांविषयी माहिती दिली. डॉ. व्ही. एन. हिस्सल यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. कार्यशाळेत उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. इंगळे, उपप्राचार्य डॉ. डी. व्ही. थोरे, डॉ. डी. बी. ढोबळे, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. डॉ. ए. के. कटके यांनी सूत्रसंचालन केले. श्वेता कलशेट्टी हिने आभार मानले.

चिकित्सक दृष्टिकोन कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात डॉ. श्रीशैल्य तोडकर यांनी भाषाशास्त्रात केल्या जाणाऱ्या संशोधनावर मार्गदर्शन केले. भाषाशास्त्रात संशोधन करताना प्रत्येक विद्यार्थ्यांकडे कल्पक दृष्टीकोन असावा, एखाद्या साहित्याची चिकित्सा करताना प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. अभ्यासकांनी साहित्याचे विश्लेषण करताना चिकित्सक दृष्टिकोन व वस्तुनिष्ठतेचा स्वीकार करावा, असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...