आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Osmanabad
  • Gutkha, Smuggling Of Meat With Cannabis From National Highways, Challenge To Police; Smuggling, Transportation From Karnataka, Andhra And Telangana To Maharashtra Including Umarga |marathi News

अवैध:राष्ट्रीय महामार्गावरून गुटखा, गांजासह मांसाची तस्करी, पोलिसांसमोर आव्हान; कर्नाटक, आंध्र व तेलंगणातून उमरगासह महाराष्ट्रात छुप्या मार्गाने विक्री, वाहतूक

उमरगा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात गुटखाबंदी असली तरी सीमावर्ती भागात असलेल्या उमरगा तालुक्यात अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. शहरासह ग्रामीण भागात अनेक टपऱ्यांवर गुटखा उघडपणे विकला जात आहे. शनिवारी (दि.२) दुपारी पोलिसांनी एक कोटी रुपयांच्या गांजा वाहतुकीवर कारवाई केली. मानवी आरोग्याला गुटखा हानीकारक आहे. गुटख्यामुळे शरीरावर परिणाम होऊन भूक मंदावते तसेच कॅन्सरसारखे दुर्धर आजारही उद्‌भवतात. शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली असली तरी जिल्ह्यासह शहर व ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने गुटख्याची उलाढाल होत आहे. उमरगा तालुक्याची हद्द कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असून तिन्ही राज्यातून छुप्या मार्गाने गुटखा, गांजा व मांस विक्री व वाहतूक शहरासोबत राज्यात होत असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रीय महामार्गावर तालुक्याच्या सीमेवर अनेक ठिकाणी चेकपोस्ट, सीमा तपासणी, पथकर नाके असताना गुटखा, गांजा व मांस वाहतूक होतेच कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुका सीमावर्ती भागात असल्याने या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होतच असते. मागील चार वर्षात जवळपास दीड कोटींचा गुटखा, एक कोटी ५४ लाख रुपयांचा गांजा तर सहा लाख रुपयांची मांस वाहतूक होत असताना कारवाई करण्यात आलेली होती. गुटख्यासोबतच बीफ, गांजा व अंमली पदार्थांची बिनदिक्कत वाहतूक होत असताना चेकपोस्ट वरूनही वाहने जातात कशी, हे न उलगडणारे कोडे आहे. अन्न व औषधी प्रशासनामार्फत तपासणीची मोहीम हाती घेतली जाते, मात्र या सर्वच अडथळ्यांवर मात करत गुटखा, गांजा व बीफ सोबतच अवैध वाहतूक होत असल्याने प्रशासनासमोर आवाहन ठाकले आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत याविरुद्ध कडक उपाययोजना करणे अपेक्षित असले तरी त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने इतर विभागांची मदत घ्यावी लागते. छुप्या मार्गाने विक्री, वाहतूक रोखण्यास मर्यादा येत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.

चढ्या दराने विक्री करून व्यवसाय वाढ
शहरासह ग्रामीण भागातील पानटपऱ्यांवर सहजपणे गुटखा उपलब्ध होतो. त्यामुळे खरोखरच राज्यात बंदी आहे की नाही? याबाबत शंका येत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. काही ठिकाणी उघड, काही ठिकाणी पेपरमध्ये गुंडाळून विक्री होत आहे. राज्यात गुटखा बंदी असल्याने व्यावसायिक चढ्या दराने विक्री करून व्यवसाय वाढवत आहे. तात्पुरती कारवाई करून प्रशासन कानाडोळा करत असल्याने यावर कठोर उपाययोजना करण्याची नागरिकांमधून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...