आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरगा पोलिसांची कारवाई:23 लाख 10 हजारांचा गुटखा जप्त ; आयशर टेम्पोसह 28 लाख रुपयांचा मुद्देमाल

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकातील कलबुर्गी येथून जिल्ह्यातील उमरगा शहरात २३ लाख १० हजार रुपयांचा बनावट गुटखा असलेला आयशर टेम्पो अवैध रित्या वाहतूक करत असताना सोमवारी पोलिसांना पेट्रोल पंपावर उभा असल्याचे दिसून आले. उमरगा पोलिसांनी कारवाई करुन गुटखा आणि पाच लाख रुपयांच्या टेम्पो सह २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील कलबुर्गी येथून निघालेला एक आयशर टेम्पो (क्रमांक एमएच १३ एएक्स ३७१६) शहरातील हिंदुस्तान पेट्रोल पंपावर उभा असून त्या मधून बनावट गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती उमरगा पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांच्या माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान कवडे, पोलिस नाईक अतुल जाधव, पोलिस हेड कॉन्स्टेबल सलीम शेख, कर्मचारी शुभम दिवे यांनी टेम्पोसह चालकास ताब्यात घेत गुटखा जप्त केला.

मंगळवारी (१) दुपारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालय समोर आयशर टेम्पोची तपासणी केली. त्यामध्ये पांढऱ्या पोत्याच्या ३५ बॅग बनावट गुटखा आढळून आला. प्रत्येक बॅगमध्ये सहा गोण्या अशा एकूण २१० गोण्या गुटखा आढळून आला. एकुण २३ लाख १० हजार रुपयांचा बनावट गुटखा, टेम्पोची किंमत पाच लाख रुपये असा एकूण २८ लाख १० हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ट्रकचालक अजिम करीम शेख (रा. हमीदनगर, उमरगा) याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर करत आहेत.f

बातम्या आणखी आहेत...