आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:उमरगा येथे कारसह दहा लाख रुपयांचा गुटखा जप्त ; तीन आरोपीवर गुन्ह्याची नोंद

उमरगा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्गावरील जकेकूर चौरस्ता येथे कारवाई करून कारसह दहा लाख ८९२ रुपयांचा बेकायदा वाहतूक करून नेला जाणारा गुटखा जप्त केल्याची कारवाई शनिवारी ५ वाजता करण्यात आली.कलबुर्गी येथून लातूरला एका कारमधून महाराष्ट्रात बंदी असलेला बनावट गुटखा जाणार, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी बरकते व त्यांच्या पथकाने एमएच ४४ बी १७५७ या कारची झडती घेतली. त्यात १९ पोत्यात बंदी असलेला गुटखा आढळला. कार सोबत दहा लाखांचा अवैध गुटखा बरकते यांनी जप्त केला. याप्रकरणी सोमवारी (दि. ७) अन्न व औषधी सुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादीनंतर तीन आरोपीवर गुन्हा नोंद झाला. दोन आरोपी अटकेत असून तिसऱ्याचा शोध सुरू आहे. एफडीए अधिकारी नसरीन मुजावर यांनी फिर्यादीवरून रहिमजैनोद्दीन शेख शमशोद्दीन महेबुब तांबोळी (जि. लातूर) यांना अटक केली. कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद येथील जाफर शेख याचा शोध सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...