आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुटखा:कोंडमध्ये पकडला 53 लाखांचा गुटखा ; वाहनांसह 70 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

उस्मानाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत कोंड (ता. उस्मानाबाद) येथे ५२ लाख ९२ हजार रुपयांचा गुटखा पकडला. ही कारवाई बुधवारी दुपारच्या दरम्यान केली. एकीकडे कारवाईची जबाबदारी असलेल्या अन्न आणि औषध प्रशासनाची भूमिका संशयास्पद असताना पोलिसांनी जिल्हास्थानापासून अगदी जवळ असलेल्या गावात इतकी मोठी कारवाई केल्यामुळे गुटखा विक्रीचे नेटवर्क किती मोठे अाहे, हे समोर आले आहे.

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कारवाई करण्यासाठी गस्तीचा होते. गस्ती दरम्यान पथकाला कोंड येथून गुटखा विक्रीचे मोठे नेटवर्क चालवले जात असल्याचे समजले. पथकाने कोंड गावात झाडझडती घेतल होते. तेव्हा महालिंग नागु कोरे कोंड शिवारातील आपल्या शेतातील गोदामात गुटखा दडवून ठेवलेला आढळला. तेथे छापा टाकला असता महालिंग कोरे याने गोदामात व त्या समोर उभ्या असलेल्या टॅम्पोत (क्र. एमएच २४, जे ७५२३), मालवाहू जीप (क्र. एमएच २४, एपू ३८८९) मध्ये ४९ पिशव्या गुटखा ठेवलेला आढळला. ५२ लाख ९२ हजारांचा गुटखा असल्याचे दिसून आले. गुटखा व दोन्ही वाहने मिळून घटनास्थळावरून ६९ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त करुन महालिंग कोरे याच्यावर ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक रामेश्वर खनाळ, हवालदार अमोल निंबाळकर, जावेद काझी, प्रकाश औताडे, विनोद जानराव, धनंजय कवडे, महेबुब अरब, सुभाष चौरे, शौकत पठाण, अजित कवडे, भालचंद्र काकडे, नितीन जाधवर, शैला टेळे यांच्या पथकाने केली आहे.

एफडीएच्या कारवाया थंड राज्य शासनाने गुटखा बंदी केल्यानंतर याची अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला प्राधिकृत केले आहे. परंतु, उस्मानाबादचे अधिकाऱ्यांची गुटखा कारवाईबाबत संशयास्पद भूमिका असल्याची चर्चा आहे. प्रशासनाच्या कार्यालयाच्या अगदी जवळच गुटखा राजरोस विकला जातो. तसेच अगदी जवळ असलेल्या बेंबळी, कनगरा, ढोकी, तेर, येडशी, वडगाव, पाडोळी (अा.) आदी ठिकाणी गुटखा विक्रीचे मोठे नेटवर्क असल्याचे सांगण्यात येते. एफडीएकडून याकडे डोळेझाक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...