आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत कोंड (ता. उस्मानाबाद) येथे ५२ लाख ९२ हजार रुपयांचा गुटखा पकडला. ही कारवाई बुधवारी दुपारच्या दरम्यान केली. एकीकडे कारवाईची जबाबदारी असलेल्या अन्न आणि औषध प्रशासनाची भूमिका संशयास्पद असताना पोलिसांनी जिल्हास्थानापासून अगदी जवळ असलेल्या गावात इतकी मोठी कारवाई केल्यामुळे गुटखा विक्रीचे नेटवर्क किती मोठे आहे, हे समोर आले आहे.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कारवाई करण्यासाठी गस्तीचा होते. गस्ती दरम्यान पथकाला कोंड येथून गुटखा विक्रीचे मोठे नेटवर्क चालवले जात असल्याचे समजले. पथकाने कोंड गावात झाडझडती घेतल होते. तेव्हा महालिंग नागु कोरे कोंड शिवारातील आपल्या शेतातील गोदामात गुटखा दडवून ठेवलेला जप्त करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.