आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामदैवत‎ हनुमान मंदिर:ज्ञानदेव मोहेकर मल्टिस्टेटने 160 कोटी ठेवींचा टप्पा केला पूर्ण‎

कळंब‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मोहा येथील शिक्षणमहर्षी‎ ज्ञानदेव मोहेकर मल्टिस्टेटने १६० कोटी‎ ठेवींचा टप्पा पार केला आहे. ग्रामदैवत‎ हनुमान मंदिराच्या सभागृहात शुक्रवारी‎ झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पाच‎ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.‎ सभेच्या अध्यक्षस्थानी मोहेकर उद्योग‎ समूहाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत मडके‎ होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे‎ मार्गदर्शक तथा ज्ञानप्रसार मंडळाचे‎ सचिव डॉ. अशोकराव मोहेकर होते.‎ हनुमंत मडके यांनी म्हणाले की,‎ संस्थेच्या २४ शाखा कार्यरत असून १६०‎ कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे.‎ मल्टिस्टेटचा २०२१-२२ आर्थिक वर्षात‎ एकूण २८३० कोटींचा व्यवसाय झाला.‎ ढोबळ नफा १२ कोटी झाला. संस्थेच्या‎ ४५ हजाराहून अधिक सभासद आहेत.‎ सर्वसाधारण सभेला मोहेकर मल्टिस्टेटचे‎ व्हाइस चेअरमन डॉ. ज्ञानोबा जाधव,‎ कार्यकारी संचालक विशाल मडके,‎ संचालक श्रीहरी बोबडे, मोहेकर अॅग्रोचे‎ संचालक बापूराव शेळके, उपसरपंच‎ सोमनाथ मडके, माजी सरपंच‎ बाबासाहेब मडके, मोहेकर मल्टिस्टेटचे‎ मुख्य कार्यालय अधिकारी फुलचंद‎ मंडके, श्रीकांत मडके, अतुल मडके,‎ इम्रान शेख, सूरज मडके, राहुल मडके,‎ कर्मचारी सभासद, ठेवीदार, ग्राहक व‎ ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे‎ प्रास्ताविक व सूत्रसंचालन बापू जोशी‎ यांनी केले तर आभार मोहेकर‎ मल्टिस्टेटचे कार्यकारी संचालक विशाल‎ मडके यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...