आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गलथानपणा , अनेकांची गैरसोय:अर्धे केमवाडी गाव महिन्यापासून अंधारात; महावितरणचे दुर्लक्ष

तामलवाडी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील विद्युत रोहित्राचा बिघाड झाल्यामुळे अर्धे गाव महिनाभरापासून अंधारात आहे. वारंवार तक्रार करुन करुनही विद्युत पुरवठा सुरळीत केला जात नसल्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दोन दिवसांत विद्युत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा राजेंद्र डोलारे यांनी दिला आहे. केमवाडी येथील फंड सिंगल फेज डीपी गेली महिना भरापासून सतत नादुरुस्त असल्याने त्या डीपी वर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत आहे.

सतत पाऊस पडत असल्याने व अंधारामुळे डासाचे प्रमाण वाढले असून लोकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्यू,मलेरिया यासारख्या साथीच्या रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदरील डीपी वरुन दलित वस्ती, आण्णा भाऊ साठे नगर,इंदिरा झोपडपट्टी या भागास विद्युत पुरवठा केला जातो. याचे कारण ही दिले जात नाही. डीपी बंद असेल तर तो दुरूस्त का केला जात नाही, याचे उत्तर येथील त्रस्त नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या डीपीच्या परिसरात गवत वाढले असून डीपी सुरू झाल्यानंतरही या परिसरातून जाताना काळजी घ्यावी लागणार आहे.

अनेकदा कळवूनही उपयोग नाही
विद्युत पुरवठा सुरळीत करावा यासाठी आम्ही वेळोवेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळवले. मात्र संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्या कारभाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी व गावातील विज पुरवठा सुरळीत करावा.
राजेंद्र डोलारे, केमवाडी

शाखा अभियंत्याने उत्तर दिले नाही
एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या वस्तीतील लोक अंधारात आपले जीवन जगत आहेत. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन वीज पुरवठा सुरुळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. यासंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी महावितरणच्या शाखा अभियंता कावरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उत्तर दिले नाही.

बातम्या आणखी आहेत...