आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील जकेकुरवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाचवी ते आठवी विद्यार्थिनींनी शालेय उपक्रमातून हस्तकलेतून नूतन वर्षाची शुभेच्छा पत्रे स्वनिर्मित तयार करून शुभेच्छापत्रे राष्ट्रपती, पंतप्रधान, सैनिक, मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, अधिकारी, नातलग आणि मित्रपरिवारांना पाठविण्यात आली.
सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांना स्व निर्मितीचा आनंद मिळत नसल्याने शाळेतील उपक्रमशील शिक्षक प्रमोद मोरे यांच्या कल्पनेतून पाचवी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थिनींनी हा उपक्रम घेला गेला. न वैविध्यपूर्ण आकर्षक आणि सुशोभित अशा शुभेच्छा पत्रांची निर्मिती केली. विद्यार्थिनींनी तयार केलेले नववर्षाच्या शुभेच्छापत्र लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि आप्तेष्टांना पाठविण्याचा निर्णय घेतला.
यासाठी सर्व विद्यार्थिनींनी स्वतः पदाधिकारी, लोकनियुक्त सदस्य, सर्वच कार्यालय प्रमुख यांचे कार्यालय व निवासाचे पत्ते संकलित करण्यात आली. टपालद्वारे ही शुभेच्छापत्र त्यांच्यापर्यंत कशाप्रकारे पोहोचवायचे याचा अनुभव प्रत्यक्षपणे कृतीतून घेण्यासाठी शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी तालुक्यातील पोस्ट टपाल कार्यालय गाठून माहिती जाणून घेतली. शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती सोबतच त्यांच्या अंगी असलेल्या विविध सुप्त कलागुणांना संधी मिळण्यासाठी विविध शालेय आणि सहशालेय उपक्रम राबवले जातात.
विद्यार्थ्यांना देशाबद्दल अभिमान वाटावा, सैनिकांबद्दल कृतज्ञता निर्माण व्हावी या बरोबर सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांची जपणूक शाळेतच व्हावी या हेतूने नववर्षांची शुभेच्छापत्रे पाठवण्याचा उपक्रम राबविला असल्याचे उपक्रमशिल शिक्षक प्रमोद मोरे यांनी सांगितले. यावेळी शिक्षक , विद्यार्थी उपस्थित होते. कोरोना काळात अनेक मुलामुलींच्या हुशारीला वाव मिळाला नाही. मात्र आता मोबाइलपेक्षा त्यांचे हात अशा कामात गंुतल्याने त्यांच्या भवितव्यास फायदेशीर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.