आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हंद्राळ जि. प. शाळेत स्वयंशासन दिन‎

उमरगा‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात हंद्राळ जिल्हा परिषद‎ प्राथमिक शाळेत गुरूवारी (दि २)‎ आठवी विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन‎ विविध उपक्रमांनी साजरा झाला.‎ मुख्याध्यापक बालाजी बडूरे, प्रमुख‎ पाहुणे जिप सहशिक्षक आनंद मोरे‎ यांच्या यांनी यावेळी मार्गदर्शन केले.‎ हंद्राळ येथील जिल्हा परिषद‎ प्राथमिक शाळेत आठवीच्या‎ विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी इयत्ता पहिली ते‎ सातवी वर्गातील विद्यार्थ्यांना‎ अध्यापनाचा अनुभव यावा म्हणून‎ आयोजित स्वयंशासन दिनानिमित्त‎ शालेय एक दिवशीय मुख्याध्यापक‎ म्हणून सुरज बिराजदार,‎ उपमुख्याध्यापक वैशाली बोयने व‎ पर्यवेक्षक म्हणून माधव बिराजदार‎ यांनी शाळेचे कामकाज पाहिले.‎ विद्यार्थ्यांना विषय शिकवण्याची‎ तयारी कशी करावी, त्याच्या मनात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उतरे कशी‎ द्यावी लागतात, आदी बाबीची जाणीव‎ स्वयंशासन दिनातून विद्यार्थ्यांनी‎ दिली.

यावेळी मोरे म्हणाले की,‎ आठवीच्या विद्यार्थ्यांना आता आपली‎ ही शाळा सोडून पुढील शिक्षणासाठी‎ दुसऱ्या शाळेत जाताना शिक्षकांनी‎ दिलेल्या शिकवणुकीतून व‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मार्गदर्शनातून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा‎ सदुपयोग करावा. यशस्वी‎ जीवनासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत व‎ सातत्य या चतुःसुत्री चा अंगीकार सर्व‎ विद्यार्थ्यांनी भविष्यात यशस्वी व्हावे‎ असे सांगितले.‎ सहशिक्षक माधव हाडोळे यांनी‎ प्रास्ताविक केले. यावेळी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मुख्याध्यापक बालाजी बडुरे यांनी‎ अपूर्व विज्ञान मेळाव्यात व उत्कृष्ट‎ छात्राध्यापकांना पारितोषक वाटप‎ केले. शिक्षक हरी जाधव यांनी‎ सूत्रसंचलन व आभार मानले.‎ सहशिक्षक शिवाजी नागदे, प्रणिता‎ बिराजदार यांनी कार्यक्रम यशस्वी‎ होण्यासाठी परिश्रम घेतले.‎

शिकविण्याचे अनुभव‎
आठवी वर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी‎ छात्राध्यापक म्हणून कार्य‎ केले.विद्यार्थ्यांनी शालेय कामकाज,‎ शालेय व्यवस्थापनासोबतच अध्यापन‎ करण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.‎ वर्गात अध्ययन करताना विद्यार्थी‎ अभ्यासाकडे लक्ष देतात का,‎ शिक्षणात अडथळे निर्माण होत आहेत‎ काय शिक्षकाच्या भूमिकेत काम‎ करताना येणारे अनुभव हा अभ्यासाचा‎ भाग होता.‎

बातम्या आणखी आहेत...