आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रामतीर्थ येथे हनुमान चालिसा पठण; हनुमान मंदिरात भाविकांच्या उपस्थितीत महाआरती

नळदुर्ग21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ येथील श्री हनुमान मंदिरात ११ जून रोजी शेकडो रामभक्तांच्या उपस्थितीत हनुमान चालिसा पठण व महाआरती करण्यात आली.

मागील अनेक महिन्यांपासून श्री क्षेत्र रामतीर्थ येथे महंत श्री विष्णू शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम होत आहे. श्री क्षेत्र रामतीर्थ येथे प्रत्येक शनिवारी श्री हनुमान चालिसा पठण व महाआरतीचा कार्यक्रम होतो. दर गुरुवारी सायंकाळी सात वाजता सुंदरकांडाचे पठण करण्यात येते. ११ जून रोजी श्री क्षेत्र रामतीर्थ येथील हनुमान मंदिरात सकाळी ९ वा. हनुमान चालिसा पठण व महाआरतीचा कार्यक्रम संपन्न झाला.

महंत श्री विष्णू शर्मा महाराज व श्री किशोर जैन महाराज हैदराबाद यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. प्रारंभी सकाळी साडेसात वाजता महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांच्या हस्ते श्री राम व श्री हनुमान शृंगार करण्यात आला. महाआरतीच्या वेळी १०८ तुपाचे दीप प्रज्वलित करण्यात आले. त्याचबरोबर १०८ रुचकीच्या पानाचा हार अर्पण करण्यात आला. महाआरतीनंतर उपस्थित रामभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रत्येक रामभक्तांनी श्री क्षेत्र रामतीर्थ येथे येऊन श्री प्रभु रामचंद्रांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांनी केले आहे.

तुपाचे दीप प्रज्वलीत
तुपाचे दीप प्रज्वलीत केल्याने मंदिर परिसरात सुगंध दरवळला होता. श्री क्षेत्र रामतीर्थ येथे सध्या रामभक्तांची श्री प्रभु रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होत आहे. दर शनिवारी हनुमान चालिसा पठण व महाआरती कार्यक्रमास नळदुर्ग, रामतीर्थ परिसरातील रामभक्त उपस्थित राहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...