आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:मोहेकर उद्योग समूहाचे हनुमंत मडकेंचा विठ्ठल पुरस्काराने सन्मान

कळंब5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विठ्ठल पुरस्काराने मोहेकर उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत मडके यांना सन्मानित करण्यात आले आहे. वारकरी साहित्य परिषद उस्मानाबाद शाखेचा अकरावा वर्धापन दिन व विठ्ठल पुरस्कार सोहळा उस्मानाबाद तालुक्यातील सिद्धेश्वर वडगाव येथे झाला. यामध्ये हनुमंत मडके यांना आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विठ्ठल पुरस्कार देण्यात आला.

यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके, माजी जिप उपाध्यक्ष धनंजय सावंत, राहुल पाटील, भाजप तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, तालुकाप्रमुख अजित लाकाळ, मनसे शेतकरी सेना शाहुराज माने, श्रीहरी चवरे, वारकरी संप्रदायातील मंडळी उपस्थित होती. पुरस्कारामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे.

बातम्या आणखी आहेत...