आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वत्र विद्यार्थ्यांचे स्वागत:पहिला दिवस आनंदाचा; कुठे घोड्यावर तर कुठे ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांची मिरवणूक; 1083 जिल्हा परिषदेच्या शाळांसह सर्वत्र विद्यार्थ्यांचे स्वागत

उस्मानाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन वर्षांचा पहिला दिवस कोरोनाच्या सावटात गेल्यानंतर निर्माण झालेले मळभ आता पूर्णपणे हटले असून यावर्षी शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षण विभागासाठी आनंदाचा ठरला आहे. विद्यार्थ्यांच्या जिल्ह्यात जंगी मिरवणूका काढण्यात आला. कोठे घोड्यावर तर कोठे सजवलेल्या वाहनात विद्यार्थ्यांना बसवण्यात आले होते.

गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस कोरोनाच्या सावटाखाली गेला आहे. २०२० मध्ये तर शाळाच सुरू होऊ शकल्या नव्हत्या. २०२१ मध्ये शाळा सुरू होण्याचा निर्णय व्हायचा. मात्र, काही दिवसात शासनाकडून हा निर्णय मागे घेतला जात होता. यामुळे जिल्ह्यात गोंधळाची परिस्थिती होती. यावर्षी मात्र, कोरोनाचे मळभ हटल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा वेगळाच उत्साह होता. जिल्ह्यातील १०८३ जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तकेही देण्यात आली. प्रत्येक नवागत बालकाचे स्वागत हातात फुल देऊन करण्यात आले.

काही ठिकाणी उत्साही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जंगी मिरवणुका काढल्या कळंब तालुक्यातील हासेगाव (के) येथे विद्यार्थ्यांची चक्क सजवलेल्या घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. गावातील भजनी मंडळींच्या समवेत प्रवेश दिंडीही काढण्यात आली होती. भूम तालुक्यातील ईटजवळील जोतीबाची वाडी येथे चक्क ट्रॅक्टरवर मिरवणूक काढण्यात आली. प्रवेश दिंडी, वाहनांवरील मिरवणूक, गुलाबाचे फुल, नवी पुस्तके, गणवेश दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा पहिला दिवस आनंदाचा गेला.

लाडू, पेढ्यांची मेजवानी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात पहिल्या दिवशीच गोड पदार्थ वाटण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामध्ये लाडू, चिलेबी, पेढे आदींची मेजवानी मिळाली. पहिला दिवस गोड झाल्यामुळे विद्यार्थ्यांचेभविष्यही गोडीत व्यतित होण्याची अपेक्षाही व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...