आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवर्धन:हर हर महादेवचा जयघोष, मावळ्यांनी केली भुईकोट किल्ल्याची साफसफाई; राजा शिवछत्रपती परिवारातील मावळ्यांनी दिवसभर राबवली मोहीम

परंडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात राजा छत्रपती परिवाराच्या मावळ्यांनी रविवारी (दि.५) स्वच्छता अभियान राबवून गड व किल्ले संवर्धनाचा संदेश दिला.

मोहिमेत शिवभक्त मावळ्यांनी भुईकोट किल्ल्यात साफसफाई केली. भुईकोट किल्ला मध्ययुगीन स्यापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. या किल्ल्याची सर्वदुर ओळख आहे. किल्ल्यात मौल्यवान पंचधातू व इतर मोठ्या आकाराच्या लोखंडी तोफा आहेत. २६ बुरुजांनी भक्कम तटबंदी असलेल्या या किल्ल्यात अनेक प्राचीन अवशेष आढळतात.

मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुईकोट किल्ला बंद होता, त्यामुळे आतील सर्व भागात मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे-झुडपे वाढल्याने किल्ला झाकोळून गेला होता. पर्यटकांना किल्ला पाहण्यासाठी मार्ग राहिला नसल्याने किल्ल्याच्या आतील भागात फिरता येत नव्हते. २६ बुरुजांवर असलेल्या मौल्यवान तोफा गवत व अनावश्यक काटेरी झुडुपांनी बुजून गेल्या होत्या. मुख्य बुरुजासह इतर बुरुजांवर व रस्त्यावर काटेरी झाडे-झुडुपे वाढली होती. त्यामुळे पर्यटकांना ती काढल्याशिवाय संपूर्ण किल्ला पाहता येणार नाही, अशी अवस्था झाली होती.

सोलापूर, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद आदी जिल्ह्यातील राजा शिवछत्रपती परिवारातील दुर्गप्रेमींनी राज्य पुरातत्व विभागाची लेखी परवानगी घेऊन येथील भुईकोट किल्ल्यात १३ मार्च रोजी स्वच्छता मोहीम राबवून अथक परिश्रमातून पर्यटकांसाठीचे रस्ते, पथ, बुरुजावरील काटेरी झाडे-झुडपे काढली होती. तसेच नृसिंह मंदिराच्या परिसरातील स्वच्छता केली होती. किल्ल्याच्या ५ ते १३ बुरुजांवरील तोफेच्या आजुबाजुचा काटेरी झाडांचा व गवताचा विळखा काढून स्वच्छता करण्यात आली. पुरातत्व विभागाकडून स्वच्छतेचे अशक्य काम राजा शिवछत्रपती परिवाराच्या मावळ्यांनी तसेच रणरागिणींनी केले. स्वच्छता करताना छत्रपती शिवराय, हर हर महादेव नामाचा जयघोष सुरू होता.

मोहिमेत राजा शिवछत्रपती परिवारातील एकूण १०० मावळ्यांच्या १० पथकांनी स्वखर्चाने येत रविवारी सकाळी ८ वाजेपासून सायंकाळपर्यंत आतील किल्ला भागातील स्वच्छता व साफसफाई केली.

प्लास्टिक बाटल्या, कॅरी बॅग, बारवातील कचरा केला गोळा करत स्वच्छता
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि.५) राजा छत्रपती परिवारातील मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन स्वच्छता मोहिमेला सुरवात केली. किल्ल्यातील विविध भागात पर्यटकांनी टाकून दिलेल्या प्लास्टिक बाटल्या, कॕॅरीबॕग व साचलेला कचरा तसेच पुरातन बारवात पडलेला कचरा गोळा करुन स्वच्छता केली.

बातम्या आणखी आहेत...