आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद:विवाहापूर्वीच कौमार्यभंगाच्या संशयावरून विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडील आठ जणांवर गुन्हा दाखल

उस्मानाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या एका २३ वर्षीय महिलेचा पतीसह सासरच्या मंडळींकडून छळ करण्यात आला. विवाहापूर्वीच कौमार्यभंग झाल्याचा संशय व्यक्त करून तिचा छळ करण्यात आल्याने विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाविषयी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, जिल्ह्यातील एका गावात २३ वर्षीय युवतीचा (नाव गाव गोपनीय) महिनाभरापूर्वीच विवाह झाला होता. विवाहपूर्वीच कौमार्य भंग झाले आहे, असा संशय तिच्या पतीने व्यक्त केला.

या कारणावरून तसेच त्या नवविवाहितेने माहेरहून पैसे आणावेत अशा कारणांसाठी पती, सासू-सासरे यांच्यासह सासरकडील ८ लोकांनी तिचा सतत शारीरिक, मानसिक छळ सुरू केला होता. संबंधित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून उपरोक्त आठ जणांवर ४९८(अ.), १०९, ३२३,५०४,३४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.