आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:होनमुर्गी सोसायटीच्या चेअरमनपदी हसापुरे, व्हाइस चेअरमनपदी नगारे

दक्षिण सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देत त्यांचा विकास डोळ्यासमोर ठेवून काम करा, असे आवाहन जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांनी केले.

होनमुर्गी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बसवराज हसापुरे तर व्हाइस चेअरमनपदी दाऊद नगारे यांची निवड झाली. दोघांचाही हसापुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या सोसायटीच्या निवडणुकीत हसापुरे समर्थक बसवराज हसापुरे, नबीलाल निंबाळे व हनुमंत पाटील यांच्या नंदी बसवेश्वर व महिबूबसुभानी शेतकरी विकास परिवर्तन पॅनलने सर्व १३ जागा जिंकत एक हाती सत्ता मिळविली. सोसायटीचे चेअरमन व व्हाइस चेअरमनपदाची काल निवड करण्यात आली. यावेळी नूतन संचालक लक्ष्मण कोळी, महादेव मेंडगुदले, सिद्राम मेंडगुदले, नबीलाल लिंबाळे, राजकुमार उंबरजे, नागनाथ याळगी, श्रीदेवी हत्तुरे, रखमाबाई पाटील, पैगंबर मुल्ला, खंडाप्पा कोंजारे व भीमराव पुजारी उपस्थित होते. यावेळी पॅनल निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेले नेते व सभासदांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी चेअरमन शिवशंकर पाटील, उपसरपंच राजू कोळी, कांतू पुजारी, रजाक निंबाळे, सतीश शिंदे, अमोगसिद्ध वाघमारे, बापू हवालदार, जंगली कादरी, दावल मुल्ला यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...