आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाहन चालकांमध्ये वाहतुक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘हासमुखराय’ हा बोलका बाहुला जिल्हा पोलिसांच्या मदतीला आला आहे. मनोरंजक पध्दतीने वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळून वाहतुकीला शिस्त लावण्याचे आवाहन ‘हासमुखराय’ करत आहे. वाहतुक पोलिस केवळ वाहनाच्या कागदपत्रांची तापासणी, दंड आकरणे अशा कामांसाठी नसून वाहतुकीला शिस्त लावणे, गर्दीमध्ये वाहतुक नियंत्रण करणे, अपघातासारख्या घटना टाळणे यासाठी सदैव कार्यरत असतात. म्हणून वाहतुक पोलिसांना प्रत्येक वाहनचालकाने सहकार्य करणे गरजेचे आहे.
त्याच बरोबर अतिवेगाने वाहन चालविणे, मद्यप्राशन करुन वाहन चालविणे असे प्रकार वाहनचालकांनी टाळावेत. ऑनलाईन दंडाची रक्कम आपल्या मोबाईल फोनवर मेसेजव्दारे आलेली असेल तर लोकअदालतीला ती भरुन घ्यावी, असे आवाहन हासमुखराय हा बोलका बाहुला करत आहे. पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.